जयाद्री मित्र परिवार. जेजुरी



सुस्वागतम




जेजुरीचा परिसर प्राचीनकाळी जयाद्री नावाने ओळखला जात होता. खंडोबाने मणी मल्ल राक्षसाचा वध करून विजय मिळविल्या वर येथे आपली राजधानी वसवली, म्हणून या परिसराला जयाद्री नाव मिळाले काळाचे ओघात ते जेजुरी झाले. विविध वनस्पती, वृक्ष, प्राणी, पक्षी, यांच्या विविधतेने नटलेला हा परिसर अनेक एत्यिहासिक घटनाचा साक्षीदार आहे. शिवरायाची तलवार शत्रूच्या रक्तात प्रथम भिजली ती याच परिसरात. इंग्रजा विरुद्ध पहिले बंड उमजीने केले ते याच परिसरात. खंडोबा वरील श्रद्धेतून येथे अनेक वास्तू जनसामान्या पासून ते सरदार होळकरा सारख्यांचे योगदानातून उभ्या राहिल्या. मराठी स्थापत्य कलेचा हा वारसा आजही उभा आहे. खंडोबाचे भक्तीतून अनेक लोककलांनी येथे जन्म घेतला, या मातीतल्या सगनभाऊ सारख्या शाहिरांनी शाहिरीला नवा वारसा दिला. येथील लिला गांधी सारख्या अनेंक नृत्यागणांनी महाराष्ट्राचे मन डोलवले. तर रोशन सातारकर सारख्या अनेक गानकोकीळानी कान तृप्त केले. साहित्य, कला, संस्कृती, निसर्ग यांचा संपन्न वारसा असणारी हि भूमी. हा वारसा चिरकाल टिकावा व त्याचे संवर्धन व्हावे व तो जन सामान्या पर्यंत पोहचवा या साठी आपल्या योगदानातून धडपडनाऱ्या मित्राची चळवळ म्हणजेच जयाद्री मित्र परिवार.